मुख्य पानावर जा (Back to Home)
GCC-TBC Complete Study & Exam Guide

GCC-TBC (30 & 40 WPM) परीक्षेची संपूर्ण माहिती, गुणांकन पद्धत आणि यशाचे तंत्र

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE, Pune) मार्फत घेण्यात येणारी शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक.

१. परीक्षेचे स्वरूप आणि उत्तीर्ण होण्याचे निकष (Section-A, B & C)

GCC-TBC परीक्षा एकूण १०० गुणांची असते आणि ती ३ स्वतंत्र विभागांमध्ये विभागलेली असते. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे उमेदवाराला Section-A, Section-B आणि Section-C या तिन्ही विभागांमध्ये स्वतंत्रपणे किमान ४०% गुण मिळवून उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

विभाग (Section)प्रश्नाचे स्वरूपएकूण गुणउत्तीर्ण गुण (Must Pass)
Section-AObjective MCQs (२५ प्रश्न)२५ गुणकिमान १० गुण
Section-BEmail, Letter & Statement३५ गुणकिमान १४ गुण
Section-CSpeed Passage (७ मिनिटे)४० गुणकिमान १६ गुण
एकूण गुण (Total)१०० गुणकिमान ४० गुण

२. गती उतारा (Section-C Speed Passage) महत्त्वाचे नियम

  • वेळ मर्यादा: गती उताऱ्यासाठी फक्त ०७ मिनिटे (४२० सेकंद) वेळ मिळतो.
  • शब्द संख्या: ३० WPM परीक्षेसाठी किमान २१० शब्द (१०५० की-स्ट्रोक्स) आणि ४० WPM परीक्षेसाठी किमान २८० शब्द (१४०० की-स्ट्रोक्स) अचूक टाईप करणे आवश्यक असते.
  • चुकांची वजावट: प्रत्येक चुकीच्या शब्दासाठी (स्पेलिंग, काना-मात्रा, अनुस्वार किंवा विरामचिन्ह चूक) गुण वजा केले जातात. त्यामुळे वेगासोबतच ९५% पेक्षा जास्त अचूकता (Accuracy) ठेवणे गरजेचे आहे.

३. मराठी टायपिंग (Remington GAIL) महत्त्वाचे शॉर्टकट्स

मराठी टायपिंग करताना विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक चुका जोडाक्षरे आणि विरामचिन्हांमध्ये होतात. खालील कीज नेहमी लक्षात ठेवा:

पहिली वेलांटी (ि)f (अक्षराच्या आधी)
पूर्णविराम (.)\ (Backslash)
स्वल्पविराम (,)] (Right Bracket)
रफार (र्)Shift + Z (अक्षरानंतर)
पदेन र (्र - उदा. प्र, क्र)z (अक्षरानंतर)
हलंत (् - अर्धे अक्षर)Shift + = (+)

४. परीक्षेपूर्वीच्या ३० दिवसांचे नियोजन कसे करावे?

दररोजचा सराव पॅटर्न:

१. दररोज सकाळी २० मिनिटे ६१ टायपिंग धडे (Lessons) मधील कठीण जोडाक्षरांचा सराव करा.
२. दुपारी किंवा संध्याकाळी किमान तीन ७ मिनिटांच्या स्पीड टेस्ट्स (Section-C) द्या आणि आपल्या चुका (Mistake Review) तपासा.
३. दररोज किमान ५० Computer MCQs (Section-A) सोडवा, जेणेकरून २५ पैकी २२+ गुण सहज मिळतील.