GCC-TBC टायपिंग सराव पोर्टल बद्दल (About Us)
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी मदत करणारे आधुनिक शैक्षणिक व्यासपीठ.
GCC-TBC Typing Practice Portal ची निर्मिती खास अशा विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली आहे जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE, Pune) मार्फत घेतल्या जाणाऱ्या English 30/40 WPM आणि Marathi 30/40 WPM (Remington GAIL Layout) परीक्षेची तयारी करत आहेत.
अनेक विद्यार्थ्यांना टायपिंग इन्स्टिट्यूटच्या वेळेव्यतिरिक्त घरी किंवा लॅपटॉपवर अचूक Remington GAIL कीबोर्ड लेआउटवर सराव करण्यासाठी योग्य सॉफ्टवेअर उपलब्ध नसते. हीच अडचण लक्षात घेऊन आम्ही हे मोफत आणि परीक्षा-भिमुख (Exam-Oriented) ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे.
अधिकृत Remington GAIL सपोर्ट
कोणत्याही बाह्य फॉन्ट किंवा सॉफ्टवेअरशिवाय थेट ब्राउझरमध्ये अचूक मराठी जोडाक्षरे, रफार आणि विरामचिन्हांसह टायपिंग सराव.
६१ टप्प्यांचा अभ्यासक्रम
नवशिक्यांपासून (Beginner) ते प्रगत (Advanced) स्तरापर्यंत बोटांची ठेवण आणि वेग वाढवणारे ६१ सविस्तर धडे.
आमची प्रमुख वैशिष्ट्ये
- प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणे ७ मिनिटांचा रिव्हर्स टाइमर आणि अचूक WPM व Accuracy विश्लेषण.
- चुकीच्या शब्दांचे (Mistake Review) आणि कमजोर कीजचे (Weak Keys) सखोल निदान.
- संगणक ज्ञानावर आधारित GCC-TBC Objective MCQ सराव प्रश्नसंच.